Monday, March 4, 2024
Homeइचलकरंजीतारदाळ जलजीवन मिशनच्या मुख्य पाईपलाईन कामास प्रारंभ

तारदाळ जलजीवन मिशनच्या मुख्य पाईपलाईन कामास प्रारंभ

गेली ६ महिने केंद्र शासनातर्फे सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेचे अंतर्गत पाईपलाईनचे काम सुरू असून रविवारी मुख्य फिल्टर हाऊस ते बसवान खिंडपर्यंतच्या मुख्य पाईपलाईनचा प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे लवकरच मुख्य अंतर्गत पाईपलाईन होवून विभागीय जलकुंभ उभारून तारदाळ, खोतवाडी गावास मुबलक पाणी मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन कमिटी सदस्य प्रसाद खोबरे यांनी दिली.

जलजीवन मिशन योजनेतंर्गत दोन्ही गावातील अंतर्गत पाईपलाईनचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून मुख्य पाईपलाईनच्या कामास आज प्रारंभ झाला. जलजीवन मिशनच्या पाईपलाईन कामाच्या शुभारंभ प्रसंगी प्रसाद खोबरे, सरपंच पल्लवी पोवार, दिपाली कोराणे, विनोद कोराणे यांचेसह मान्यवर. (छाया गजानन खोत ) यावेळी फिल्टर हाऊस ते हातकणंगले – जयसिंगपूर मुख्य हायवेलगत बसवान खिंडीजवळ असणारे दादासो पाटील यांनी आपल्या जमिनीतून पाईपलाईन टाकण्यास संमती दिल्याने हे काम लवकरच पूर्ण होत आहे.

यावेळी सरपंच पल्लवी पोवार, विशाल कुंभार, उपसरपंच
दिपाली कोराणे, विनोद कोराणे, चंद्रकांत तांबवे, रणजीत पोवार, नितीन खोचरे, गजानन नलगे, सुरज कोळी, जीवन माने, पिंटू दाते, सतिश नर्मदे, भिमराव बन्ने, सुरेश पोवार, सावंता माने, निरगुंडे मामा, पिंटू मांदिसे यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -