Tuesday, May 21, 2024
Homeकोल्हापूरपुरोगामी कोल्हापूरवर लागलेला डाग कोल्हापूरकर लवकर पुसून टाकतील

पुरोगामी कोल्हापूरवर लागलेला डाग कोल्हापूरकर लवकर पुसून टाकतील

सद्भावना यात्रेच्या सुरुवातीस हातात भगवा आणि तिरंगा ध्वज घेऊन मुली सहभागी झाल्या होत्या. आ. ऋतुराज पाटील, आ. जयंत आसगावकर, आ. जयश्री जाधव, माजी आमदार संजय घाटगे, मालोजीराजे छत्रपती, इंद्रजित सावंत, यशराजराजे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षवेधी होती.

भारती पोवार यांनी स्वागत केले. वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, सचिन चव्हाण, कॉ. चंद्रकांत यादव, बाबुराव कदम, उदय नारकर, दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, तौफिक मुलाणी, मेधा पानसरे, संदीप देसाई, राजेश लाटकर, गिरीश फोंडे, दिलीप देसाई, अतुल दिघे, डी. जी. भास्कर, सुभाष देसाई, बबन रानगे, विक्रांत पाटील-किणीकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लहान मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग

या यात्रेत लहान मुलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा गांधी यांचे पोस्टर घेऊन मुलींनी हजेरी लावली. एक मुलगी डोक्यावर तिरंगा घेऊन नातेवाईकाच्या खांद्यावर बसून यात्रेत सहभागी झाली. हातात भगवे ध्वज घेऊन अनेक मुले सहभागी झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -