Saturday, July 27, 2024
Homeसांगलीलक्ष्य सांगली लोकसभा,विधानसभा; विश्वजित कदमांनी सिद्धरामय्यांच्या उपस्थितीत फुंकले रणशिंग

लक्ष्य सांगली लोकसभा,विधानसभा; विश्वजित कदमांनी सिद्धरामय्यांच्या उपस्थितीत फुंकले रणशिंग

सांगली: ‘‘दक्षिण दिग्विजया’नंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या पहिल्यांदा महाराष्ट्रात येत होते. चार दिवसांचा अवधी होता. काँग्रेसचा महानिर्धार मेळावा मी पलूस-कडेगावला घ्यावा, असे ‘प्रदेश’चे नेते मला सुचवत होते. परंतु, मी तो सांगलीत घेतला. कारण मला सांगलीची लोकसभा व विधानसभा जिंकायची आहे. ती आपण जिंकणारच,’’ असा महानिर्धार करत माजी मंत्री, आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी आज २०२४ च्या आखाड्याचे रणशिंग फुंकले.

येथील नेमिनाथनगरमधील कल्पद्रुम क्रीडांगणावर झालेला काँग्रेसचा महानिर्धार मेळावा, शेतकरी मेळावा आणि धनगर समाजातर्फे सिद्धरामय्यांचा सत्कार हा सोहळा विश्‍वजित यांचे राजकीय कौशल्य आणि व्यवस्थापनातील प्रभुत्व अधोरेखित करणारा ठरला.मतदार संघाबाहेर, जिल्ह्याच्या ठिकाणी प्रचंड गर्दीत मेळावा घेण्याचे शिवधनुष्य पेलतानाच त्यांनी तुबची-बबलेश्‍वर सिंचन योजनेतून जत सीमाभागाला शाश्‍वत स्वरुपात पाणी द्या, बेळगाव जिल्ह्यातील आमच्या मराठी बांधवांची काळजी घ्या.अलमट्टी धरणातून गरजेनुसार पाणी सोडून येथे महापूर येणार नाही, यासाठी काळजी घ्या, अशी स्पष्ट मागणी करत विश्‍वजित यांनी नेतृत्वाच्या कक्षा रुंदावण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

त्यात सांगली लोकसभा आणि विधानसभा आम्हीच जिंकू, हा त्यांचा आत्मविश्‍वास आणि त्यासाठी आज केलेली ‘मशागत’ विरोधकांच्या मनात धडकी भरवणारी आणि काँग्रेसकडून लढू इच्छिणाऱ्यांचा आत्मविश्‍वास दुणावणारी ठरली.डॉ. कदम म्हणाले, ‘‘आम्ही सांगली जिल्हा एक केला आहे. एका विचाराने काम सुरू आहे. ही समोरची माणसं आमची ताकद आहेत.कर्नाटकच्या विजयाने देशात काँग्रेसमध्ये उत्साही वातावरण आहे. जिल्ह्यात चैतन्य निर्माण झाले आहे.

सिद्धरामय्याजी आले हा मोठा ‘बूस्टर’ आहे. लोकसभा, विधानसभा विजयाची सुरवात आम्ही सांगलीतून करून दाखवू.’’विश्‍वजित आमचे नेते : विशालकाँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी विश्‍वजित कदम आमचे नेते असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू, अशी घोषणा केली. ते म्हणाले, ‘‘सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला नाही, असे ज्यांना वाटते त्यांनी ही गर्दी पाहून जावे.

इथे काँग्रेसला थोडी मरगळ आली होती.परंतु विश्‍वजित कदम यांनी आम्हाला ताकद दिली, विश्‍वास दाखवला आणि आज वातावरण बदलले आहे. मधल्या काळात आमच्या चुका झाल्या, नुकसान झाले, मात्र आम्ही एक आहोत. आम्ही पाटील मूळ कदम आहोत.तुळजापुरातून ४०० वर्षांपूर्वी एक कदम इकडे आले होते, तेच आमचे पूर्वज. विश्‍वजित व आम्ही भाऊ आहेत. त्यांच्या पाठीशी वसंतदादा घराणे उभे राहील.

’’खासदार संजय पाटील यांनी काम कमी व प्रॉपर्टी जमवण्याचा, जमिनींवर कब्जा घेण्याचा उद्योग जास्त केला, असा घणाघातही विशाल पाटील यांनी केला. तसेच ‘व्ही फॉर व्हिक्टरी’चा उल्लेख करत जिल्ह्यात विशाल पाटील, विश्‍वजित कदम व विक्रम सावंत हे ‘थ्री व्ही’ काँग्रेसच्या विजयासाठी एकत्रित काम करतील, अशी ग्वाही दिली.मेळाव्यात लक्षवेधीगांधी टोपी परिधान करून हजारो विश्‍वजित समर्थक सहभागीविश्‍वजित यांचा इंग्रजी, तर विक्रम सावंत यांचा कानडीतून सिद्धरामय्यांशी संवादसिद्धरामय्या यांचा ‘शेतकऱ्यांचे प्रतीक’ बैलगाडीची प्रतिकृती देऊन सत्कारसोलापूर काँग्रेसकडून तुळशीचा हार, तर विश्‍वजित यांच्याकडून सुती हार घालून सत्कारधनगर समाजाकडून काठी अन् घोंगडं, अहिल्यादेवींची प्रतिमा देऊन गौरवजतकरांनी फलक दाखवून पाण्याची मागणी केलीसिद्धरामय्यांनी घुंगरकाठी वाजवून पारंपरिक बाज जपलाजिल्हा, प्रदेश, देशपातळीवरील

काँग्रेस नेत्यांचे लक्षवेधी ब्रँडिंगसोनिया गांधींच्या राजकीय प्रवासाचा लघुपट दाखवत दिली मानवंदना‘पंजा लढा’ गाण्याने काँग्रेस युवा कार्यकर्त्यांत भरले उत्साहाचे वारेराहुल गांधी, विश्‍वजित कदम यांचे ‘भारत जोडो’तील व्हिडिओ ठरले लक्षवेधीगजी नृत्याचे पथक, धनगरी ढोलच्या गजराने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह‘भारत जोडो’ दांडी यात्रेचे काम करेल’डॉ. कदम म्हणाले, ‘‘महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढली आणि इंग्रजांना भारत सोडण्यास भाग पाडले. तेच काम राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा करेल. ते ३ हजार ७०० किलोमीटर पायी चालले. लोक त्यांना भेटत होते, प्रश्‍न, वेदना सांगत होते. कर्नाटकच्या निकालात यात्रेचा प्रभाव दिसला, तो देशातही दिसेल. महाराष्ट्रात वातावरण बदलत आहे.’’

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -