कोल्हापूर म्हणजे छत्रपती शाहु महाराजांची नगरी. इथली संस्कृती, इथला इतिहास, इथले पर्यटन, शिक्षण, उद्योगनगरी अशा सगळ्या गोष्टी शाहु महाराजांच्या स्पर्शाने परिस झाल्या आहेत. त्यांच्यामुळेच त्यांनी उभं केलेलं हे शहर आज जगभरात नावारुपाला आलेलं आहे. कोल्हापूरमध्ये शाहु महाराजांनी केलेल्या प्रत्येक कार्याचा एक वेगळा इतिहास आहे.
यातीलच उद्योगाचा आणि त्यातही कापड उद्योगाचा इतिहास आज वाचणार आहोत.१९०६ मध्ये छत्रपती शाहू राजांनी उद्योगधंद्यांच्या क्षेत्रात कोल्हापूर संस्थानात सर्वात मोठा कापड निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला. ‘दि. शाहू छत्रपती स्पिनिंग अॅंड विव्हिंग मिल्स’ या गिरणीची स्थापना त्यांनी केली. या प्रकल्पासाठी कोल्हापूर संस्थानात शाहू राजांनी विस्तीर्ण जागा, पाण्याचे तळे आणि तब्बल ५० हजार रुपयांचे भांडवल उपलब्ध करुन दिले होते.
राजांच्या या निर्णयामुळे कोल्हापूर संस्थानातील त्याकाळच्या शकडो लोकांना रोजगार उपलब्ध झाला होता. इतकेच नाही तर अखंड हिंदुस्थानच्या कापड उद्योगाच्या नकाशावर ठळकपणे कोल्हापूर हे नाव दिसू लागले होते.२७ सप्टेंबर १९०६ साली दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या गिरीणीचे उद्घाटन झाले आणि कापड उद्योगात कोल्हापूरने आपला ठसा उमटवायला सुरुवात केली होती. विजयादशमीच्या दिवशी मराठे नवा मुलूख जिंकण्यासाठी विजयी मोहिमेवर निघत असत.
छत्रपती शाहूंनी या उद्योगाच्या यशस्वितेसाठी माझे संपूर्ण सहकार्य राहील असे वचन जनतेला दिले होते. त्यासोबत कोणत्याही परिस्थितीत हा चालु केलेला उद्योग बड्या गिरणी मालकांच्या आणि धनिकांच्या ताब्यात जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी कोल्हापूरच्या लोकांनी दक्ष राहिले पाहिजे आणि उद्योगात यश संपादन केले पाहिजे. जगाला हे समजून चुकायला हवे कीयानंतर संस्थानातील शिरोळ, इचलकरंजी, गडहिंग्लज या ठिकाणी जिनिंग फॅक्टरींच्या स्थापना झाल्या.
साधारण १९१३ च्या सुमारास संस्थानातील पहिली ऑईल मिल, पहिली सॉ मिल, इलेक्ट्रॉनिक कंपनी, पहिली फाऊंड्री फॅक्टरी, मोटार ट्रान्सपोर्ट कंपनी फॅक्टरी असे अनेक उद्योग सुरु झाले. निरनिराळ्या उद्योगासाठी प्रशिक्षित कामागार तयार व्हावेत म्हणून ‘राजाराम इंडस्ट्रियल स्कूल’ची स्थापन करण्यात आली.संस्थानाबाहेरच्या उद्योजकांनीही महाराजांनी त्यांच्या व्यवसायात वाढीसाठी मदत केल्याची उदाहरणे अनेक संदर्भात सापडतात.
त्यात मुंबईचे सरदारगृहाचे मालक विश्वनाथ साळवेकर व किर्लोस्कर कारखान्याचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या नावाचा प्रामुख्याने समावेश होतो. शाहू महाराज अनेकांना सढळ हाताने मदत करत होते. यातून त्यांच्या घराण्याचे आणि महाराज असण्याची अहंकारी वृत्ती कधीच दिसून आली नाही, असेही अनेक ठिकाणी संदर्भासहित सांगितले जाते.