Friday, June 12, 2026
Homeराजकीय घडामोडीसुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार

सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारपदाचा राजीनामा देणार आहेत.(resign)सुनेत्रा पवार संध्याकाळी 5 वाजता राज्यसभेचे सभापती सी पी राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर त्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. सुनेत्रा पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. बारामतीमधील पोटनिवडणुकीतील निकालानंतर सुनेत्रा पवार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. सुनेत्रा पवार यांचा बारामती पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय झाला असून, त्यांना एकूण 2 लाख 18 हजार 969 मतं मिळाली आहेत. त्यांनी अजित पवारांचा विजयाचाही रेकॉर्डही मोडला आहे. आमदार झाल्याने आता त्यांना खासदारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

 

सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर कोणाला संधी दिली जाणार (resign)याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, जय पवार, छगन भुजबळ आणि नितीनकाका पाटील यांची नावं चर्चेत आहे. सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं तेव्हा छगन भुजबळांचीही खासदार होण्याची इच्छा होती. मात्र त्यांना डावलून सुनेत्रा पवारांना खासदार करण्यात आलं होतं. त्यांना आता राज्यसभेची खासदरकी देत ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होईल अशी सूत्रांची माहिती आहे.

 

जय पवार यांना विधान परिषदेवर पाठवत आमदार केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. (resign) मात्र पक्षाने झिशान सिद्दिकी यांच्या नावाची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर जय पवार यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं. जय पवार यांना राज्यसभेत पाठवल्यास, पार्थ पवारही खासदार असल्याने दोन्ही बंधू सभागृहात एकत्र दिसतील. सातारा लोकसभा मतदारसंघातील वाई विधानसभा मतदारसंघात प्रचारसभेत अजित पवार यांनी नितीनकाका पाटील यांना राज्यसभेचं खासदार करण्याचा शब्द दिला होता. अजित पवारांच्या अनुपस्थितीत पक्षाकडून हे आश्वासन पाळलं जाण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -