ताजी बातमी ऑनलाईन टीम
जर तुम्हाला 12 वी नंतरच पायलट बनायचे असेल तर तुम्ही पायलट ट्रेनिंग प्रोग्राम करु शकतात. पायलट बनण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? भारतीय वायुदलात भर्ती होण्यासाठी काय करावं लागेल? जाणून घ्या.
12 वी नंतर पायलट बनण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही 12 वी सायन्स सायन्स माध्यमातून पूर्ण केलेलं असावं. काही पायलट ट्रेनिंग इंस्टीट्यूट कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश देतात. 12 वी नंतर पायलट बनण्यासाठी विद्यार्थ्यांचं वय कमीत कमी 17 वर्ष असले पाहिजे. पायलट बनण्यासाठी फिटनेस आणि मेडिकल प्रमाणपत्र द्याव लागेल.
पायलट 5 प्रकारचे असतात. एयरलाइंस ट्रांसपोर्ट पायलट, प्रायव्हेट पायलट, स्पोर्ट्स पायलट, फ्लाइट इंस्ट्रक्टर, एयरफोर्स पायलट. प्रत्येक पायलटच्या अभ्यासासाठी वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्था असतात.
12 वी नंतर पायलट बनण्यासाठी Commercial Pilot Training प्रोग्राममध्ये प्रवेश घ्यावा लागतो. यासाठी एक प्रवेश परीक्षाही असते. यासाठी मुलाखातही होते. मुलाखतीत उत्तीर्ण झाल्यावर मेडिकल टेस्ट द्यावी लागते. 12 वीनंतर पायलट बनण्यासाठी 15 ते 20 लाख रुपये खर्च होतात.
भारतीय वायुदलातून पायलट बनण्यासाठी NDA परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते. 3 वर्षांचा हा कोर्स पूर्ण झाल्यावर फ्लाइंग ट्रेनिंगमध्ये भाग घ्यावा लागतो.
12 वी नंतर करा ‘हा’ कोर्स आणि व्हा पायलट, जाणून घ्या!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -