Wednesday, July 30, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज, तर काहींना यलो अलर्ट

राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज, तर काहींना यलो अलर्ट

महाराष्ट्रात येत्या चार-पाच दिवसांत मान्सून सक्रीय राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
मुंबई, पुण्यासह रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली या भागांना ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, जालना, अकोला, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.


राज्यात मान्सून सक्रिय झाला असून राज्याच्या विविध भागांत चांगला पाऊस झाला आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात आधी रिमझिम बरसणाऱ्या पावसाने नंतर चांगलाच जोर धरला. पुणे जिल्ह्याच्या इंदापूरमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला. लातूर, सांगली जिल्ह्यातही संततधार सुरू आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा जिल्ह्यातदेखील मूसळधार पावसाने ठाण मांडले आहे.

नागपूर जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहे. तर महाराष्ट्रातील काही भागांत आज मूसळधार पावसाचा इशारादेखील देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -