Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगराष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पद धोक्यात;अजित पवार यांची इच्छा पूर्ण होणार?

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पद धोक्यात;अजित पवार यांची इच्छा पूर्ण होणार?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा… अशी मागणी विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केली होती. विरोधी पक्षनेतेपदाएवजी संघटनात्मक जबाबदारी देण्याची मागणी अजित पवार यांनी यानी शरद पवार यांच्याकडे केली होती. लवकरच अजित पवार यांची ही इच्छा पूर्ण होणार. राष्ट्रवादीत भाकरी फिरणार आहे. लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये संघटनात्मक बदल होणार आहेत. लवकरच राष्ट्रवादीचा नविन प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार आहे. जयंत पाटील हे सध्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक बदल होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया येत्या दोन महिन्यात होण्याची शक्यता आहे. ऑगस्टपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्षपदाची निवड होण्याची शक्यता आहे. यासंबंधी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. अजित पवारांनी प्रदेशाध्यक्ष होण्यासंबंधी सूचक विधान केलं होतं तर छगन भुजबळांनी ओबीसी कार्ड खेळलं होतं. त्यामुळेच राष्ट्रवादीत भाकरी फिरवल्यामुळे कुणाची विकेट पडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतीच कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आलीय. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपद पदाची इच्छा बोलुन दाखवलीय. त्यानंतर भुजबळांनीही तशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा राष्ट्रवादीचा नविन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कोण होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा. आमदारांच्या आग्रहाखातर विरोधी पक्षनेता झालो. विरोधी पक्षनेतेपदाएवजी संघटनात्मक जबाबदारी देण्याची मागणी अजित पवार यांनी केली होती. अनेक ठिकाणी संघटनात्मक बदल झाले पाहिजेत. भाकरी फिरवावयाची झाली तर फिरलीच पाहिजे असेही अजित पवार म्हणाले होते. विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी अजित पवार यांनी केल्या नंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना टोला लगावला होता. विरोधी पक्षनेतेपद सोडण्यापेक्षा सरकारवर लक्ष ठेवले पाहिजे असा सल्ला जयंत पाटील यांनी अजित पवार यांना दिला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -