Thursday, December 26, 2024
Homeब्रेकिंगशिंदे-फडणवीस सरकारची आज वर्षपूर्ती! मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?

शिंदे-फडणवीस सरकारची आज वर्षपूर्ती! मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?

ताजी बातमी ऑनलाईन टीम
गेल्या वर्षीच्या जून महिन्यांचा शेवटच्या आठवडा महाराष्ट्र राजकारणातील सर्वात घडामोडीचा ठरला होता. महाराष्ट्रातील राजकारणातील महत्त्वाचा पक्षात मोठी फूट पडली. शिवसेनेचा एकनिष्ठ म्हणून जो चेहरा पाहिला जायचा त्या एकनाथ शिंदेंसोबत 40 आमदार बाहेर पडली. गुवाहाटी त्या हॉटेलमधून राज्यातील नव्या सरकारचा उदय झाला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. 30 जून म्हणजे आज शिंदे फडणवीस सरकरची वर्षपूर्ती.

एक वर्षात अनेक चढ उतार पाहता या सरकारने अखेर एक वर्ष पूर्ण केलं. पण या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नव्हता. पण आता राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आल्याचं बोलं जातं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यांनी तातडीचा नवी दिल्लीला दौरा केल्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे.

कधी होणार विस्तार?
जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे या केंद्रापाठोपाठ महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे, असं बोलं जातं आहे. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त असण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -