Monday, July 7, 2025
Homeतंत्रज्ञानकेंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय ! आता ‘या’ महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्डची...

केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय ! आता ‘या’ महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्डची गरजच नाही

भारतात आधार कार्ड हे एक प्रमुख सरकारी दस्तऐवज आहे. हे दस्तऐवज प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये बंधनकारक आहे. व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्वत्र या कागदपत्राची आवश्यकता भासते.भारतात एक साधं सिमकार्ड जरी काढायचं असेल तरी देखील आधार कार्ड लागतं.

बँकेत देखील आधार कार्ड लागतेच. एकूणच काय आधार कार्ड विना भारतात कोणतेच काम होऊ शकत नाही. अशातच मात्र आधार कार्ड संदर्भात केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा देशभरातील लाखो लोकांना फायदा होणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, आता आधार कार्ड जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र बनवताना आवश्यक राहणार नाही. आता आधार कार्ड शिवाय हे प्रमाणपत्र मिळू शकते. केंद्र शासनाने या संबंधित निर्णय घेतला असून याची अधिसूचना देखील निर्गमित करण्यात आली आहे.

यासाठी आयटी मंत्रालयाच्या माध्यमातून काही मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. यानुसार आता जन्म मृत्यू नोंदणी करताना आधार डेटाबेस वापरता येणार आहे. सरकारने या सूचना जन्म-मृत्यू नोंदणी कायदा 1969 अंतर्गत जारी केल्या आहेत.

या आधी सूचनेनुसार आता रजिस्ट्रारला जन्म किंवा मृत्यूच्या अहवालात होय किंवा नाही पर्याय निवडण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय रजिस्ट्रार आता त्याला हवे असल्यास तो आधारची पडताळणी करू शकतो. म्हणजेच ही पडताळणी ऐच्छिक करण्यात आली आहे. हे बंधनकारक राहणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -