सांगली,शहरातील अभयनगर मध्ये असणाऱ्या एका अपार्टमेंट मधील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी घरफोडी केली. घरात ठेवलेल्या सोन्याचांदीच्या दागिन्यांसह १ लाख ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. सदर घरफोडीची घटना ही मंगळवार दि. २० जून ते बुधवार दि. २८ जून या कालावधीत साईप्रसाद अपार्टमेंट येथे घडली. या प्रकरणी मारुती रामचंद्र बंडगर (वय ३०) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मारुती बंडगर हे आपल्या कुटुंबियांसह अभयनगर परिसरातील स्टेट बँक कॉलनी मध्ये सणाऱ्या साई प्रसाद या अपार्टमेंट मधील एका फ्लॅट मध्ये भाड्याने राहतात. मंगळवार दि. २० जून रोजी बंडगर हे कामानिमित्त कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटवर पाळत ठेऊन फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूम मध्ये असणाऱ्या कपाटात ठेवलेले १ लाख ५३ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरून चोरटयांनी तेथून पलायन केले. बुधवार सायंकाळी पाऊणे पाच वाजण्याच्या सुमारास बंडगर हे घरी परतले असता त्यांना दरवाजाचे कुलूप तुटल्याचे दिसले. त्यांनी आत जाऊन पहिले असता कपाटातील ३ दागिने लंपास झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
כי