ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्यासह देशभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्याचा फटका आता वाहतुकीवर देखील पडताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गाला पावसाचा जोरदार फटका बसला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतूक जवळपास ठप्प झाल्यात जमा आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा देशातील अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. या महामार्गातून प्रवासी वाहतुकीसोबतच अवजड वाहतूक देखील होत असते. पण जोरदार पावसामुळे या महामार्गावर काही ठिकाणी वाहतूक बंद सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचलं आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईहून गुजरात आणि गुजरातहून मुंबईला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. वसईतील ससू नवघर या ठिकणी रस्त्यावर पाणी साचलं आहे. रस्त्याच्या बाजूला डोंगर आहे. त्या डोंगराचं पाणी रस्त्यावर वाहून येतंय. पण हे पाणी समुद्राच्या दिशेला जाण्यासाठी अडथडे येत आहे. या पाण्याचा समुद्राच्या दिशेला जाण्यासाठी निचरा होत नाहीय.
स्थानिकांचा प्रशासनावर आरोप
संबंधित परिसरात रस्त्यालगत बांधकाम झालंय. नाले बुजवण्यात आले आहेत. त्यामुळे पाणी समुद्रात जाण्यासाठी अडथळा येतोय. तर दुसरीकडे प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय. नालेसफाई झालेली नाही, असा स्थानिकांचा आरोप आहे.
पावसामुळे मोठा फटका, सर्व ठिकाणी पाणीच पाणी, वाहतूक ठप्प!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -