Saturday, July 27, 2024
Homeआरोग्यविषयकही लक्षणे दर्शवतात शरीरातील प्रोटीनची कमतरता; जाणून घ्या उपाय

ही लक्षणे दर्शवतात शरीरातील प्रोटीनची कमतरता; जाणून घ्या उपाय


शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्याला सर्वप्रकारच्या पोषक तत्वांची (Nutrients) गरज असते. परंतु सध्याच्या धावपळीच्या आयुष्यामुळे लोकांना आपल्या आहाराकडे आवश्यक तितके लक्ष देता येत नाही आणि त्यामुळेच शरीराला योग्य ती पोषक तत्व मिळत नाहीत. उत्तम आरोग्यासाठी आणि मानसिक विकासासाठी आपल्या शरीराला सर्वच पोषक तत्वांची गरज असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्रोटीनयुक्त पदार्थांविषयी (Protein rich foods) माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊया प्रोटीनची कमतरता (Protein Deficiency) दर्शविणारी काही लक्षणे आणि ती दूर करण्याबाबतच्या उपायांविषयी…

प्रोटीनची कमतरता दर्शविणारी लक्षणे (Protein Deficiency Symptoms)
– थकवा, अशक्तपणा
– केस आणि नखे कमकुवत होऊन तुटणे
– केस रुक्ष होणे व त्यामध्ये गुंता वाढणे
– स्नायूंमधील कमकुवतपणा वाढणे
– हाडे कमकुवत झाल्यामुळं ती मोडण्याचा धोका
– सतत इंफेक्शन होणे

प्रोटीनची कमतरता दूर करण्याचे उपाय
अंडी (Eggs): अंडी प्रोटीनचा उत्तम स्रोत मनाली जातात. अंड्यांमध्ये प्रोटीनबरोबरच कॅल्शिअम ,ओमेगा-3 फॅटी अॅसिड देखील भरपूर प्रमाणात असते. त्यामुले अंड्यांचे सेवन केल्याने शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून निघते.

डेअरी प्रोडक्ट्स (Dairy products) : डेअरी प्रोडक्ट्सदेखील प्रोटीनचा उत्तम स्रोत असतात. यांमध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन यांसारखी पोषक तत्वेदेखील असतात. त्यामुळे डेअरी प्रोडक्टचाही आपल्या आहारात नियमत समावेश करावा.

सोयाबीन (Soybeans) : प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही सोयाबीनचा देखील आहारात समावेश करू शकता. सोयाबीन मिल्क, सोया टोफू, सोया नट या पदार्थांचा आहारात समावेश करू शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर करता येऊ शकते.
मोड आलेले धान्य : मोड आलेले धान्य इतर पोषक घटकांसह प्रोटीनने समृध्द असतात. सकाळी रिकाम्या पोटी मोड आलेले धान्य खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

चिकन (Chicken) : चिकनमध्ये व्हिटॅमिन बी आणि इतर असे काही पोषक घटक असतात ज्यात जास्त प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे चिकनचे सेवन केल्याने शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर होण्यास मदत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -