Friday, February 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : जेवण देत नाही म्हणून चिडलेल्या पतीकडून पत्नीचा खून घरामागे ...

कोल्हापूर : जेवण देत नाही म्हणून चिडलेल्या पतीकडून पत्नीचा खून घरामागे पुरला मृतदेह

पत्नी जेवण देत नाही, व्यवस्थित बोलत नाही, या कारणांवरून चिडून पती दगडू सखाराम चौगुले (वय ७०, रा. गजापूर पैकी दिवाणबाग, ता. शाहूवाडी) यांनी पत्नी लक्ष्मी चौगुले (वय ६०) हिचा खून करून मृतदेह घराच्या पाठीमागील जागेत पुरल्याची घटना आज उघड झाली.याबाबतची तक्रार मुलगा गणेश चौगुले याने पोलिसांत दिली. आरोपी दगडू चौगुले याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी दिली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दगडू चौगुले पत्नी लक्ष्मीसोबत गजापूरपैकी दिवाणबाग येथे राहतात. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वारंवार वाद होत असत. २९ जून ते ३ जुलैदरम्यान जेवण न देणे व एकमेकांशी व्यवस्थित न बोलण्याच्या कारणांवरून दोघांत वाद झाला.त्यावेळी दगडू चौगुले यांनी पत्नी लक्ष्मीच्या डोक्यावर, मानेवर, चेहऱ्यावर व पाठीत हाताने व पायाने मारून, जखमी करून तिचा खून केला. घडला प्रकार कोणाला समजू नये, यासाठी मृतदेह घराच्या पाठीमागील जागेत पुरला व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, मुलगा आज मुंबईहून गावी आला आणि आई दिसत नसल्याने विचारपूस केली असता घडला प्रकार उघड झाला. त्यानंतर गणेश याने थेट वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी चौकशी केली असता, खुनाचा प्रकार उघड झाला.अन्‌ खुनाचा उलगडा झाला

दरम्यान, घाटकोपर (मुंबई) येथे नोकरीनिमित्त राहणारा त्यांचा मुलगा वारंवार घरी फोन करून आई-वडिलांची खुशाली विचारत होता. २९ जूनपासून त्याने बऱ्याचदा घरी फोन केला. त्यावेळी वडील फोनवर बोलायचे, मात्र आई फोनवर बोलत नव्हती. आईशी बोलायचे आहे, तिच्याकडे फोन द्या, असे विचारल्यास मात्र वडील उडवाउडवीची उत्तरे देत होते. ती घरी नसल्याचे सांगत होते. त्यावरून

आणि बरेच दिवस झाल्याने गणेशला घरात काही तरी वाद झाल्याची शंका येऊ लागली. मुलगा अखेर मुंबईवरून गावी आला. वडिलांकडे चौकशी केल्यानंतर या खुनाचा उलगडा झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -