ताजी बातमी ऑनलाईन टीम
राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर कोल्हापूर महापालिकेतील पदाधिकारीपद भूषविलेल्या बहुतांश माजी नगरसेवकांची मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबरच जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेले दोन दिवस शांत आणि व्दिधामन:स्थितीत असणाऱ्या माजी नगरसेवकांनी आता हळूहळू आपले मौन सोडत मुश्रीफच आमचे नेते, त्यांनी आमचे करिअर घडविले, कठिण प्रसंगी त्यांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळे आता त्यांच्याबरोबरच राहणे संयुक्तिक वाटते, अशी खासगी प्रतिक्रिया देत माजी नगरसेवकांनी थोरल्यासाहेबांपेक्षा मुश्रीफ यांचा हात धरून उपमुख्यमंत्री अजितदादांच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
कोल्हापूर महापालिकेवर गेली दहा वर्षे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची सत्ता आहे. पाटील – मुश्रीफ यांनी त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बरोबर घेत सत्ता आपल्याकडे राखली. गेल्या दोन्ही सभागृहात राष्ट्रवादीचे किमान चौदा पंधरा नगसेवक निवडून आले. मुश्रीफांनी या नगसेवकांना राजकीय, आर्थिक बळ दिले. तसेच मंत्रीपद असताना निधीही दिला. शहरात राष्ट्रवादीचे मुश्रीफांच्या तोडीचे नेतृत्वही तयार झाले नाही. किंबहुना राजकीय सत्ताकारणात शहरात स्थानिक मोठे नेतृत्व तयार होणार नाही याचीही दक्षता घेतली गेल्याचे सांगितले जाते.
वीस वर्षांतील राजेश लाटकरांचा अपवाद वगळता माजी महापौर आर. के. पोवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राहिले, पण त्यांच्या कार्यकाळात मुश्रीफांच्या आदेशानेच राष्ट्रवादीची वाटचाल सुरू राहिली. त्यामुळे कागलमधील आदेशाने कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवकांची आणि शहरातील पदाधिकाऱ्यांची वाटचाल राहिली. आता मुश्रीफ अजितदादांबरोबर गेल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व आर. के. पेवार यांच्याकडे आले आहे. पण त्यांच्या नेतृत्वाला मर्यादा आहेत. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीचे बहुतांश माजी नगरसेवक, पदाधिकारी मुश्रीफ यांच्याबरोबर जाणार हे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांचा मुश्रीफांकडे कल; उपमुख्यमंत्री अजित पवारांना साथ देणार; शहरात भव्य पोस्टर झळकवून
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -