Sunday, July 6, 2025
Homeब्रेकिंगपर्यटकांसाठी व राऊतवाडी धबधब्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना महत्वाची बातमी..

पर्यटकांसाठी व राऊतवाडी धबधब्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना महत्वाची बातमी..

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राशिवडे : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधब्यास भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांना आता पैसे मोजावे लागणार आहेत. धबधबास्थळ देखभाल दुरुस्ती खर्चासाठी पर्यटकांकडून कर रुपाने ही आकारणी केली जाणार आहे. यामध्ये प्रौढांकडून १० रुपये तर लहान मुलांसाठी ५ रुपयांची आकारणी केली जाणार आहे. हा निर्णय ग्रामसमितीने घेतला आहे.

यापुर्वी चारचाकी गाडी पार्कींगसाठी पर्यटकांकडून शुल्क आकारणी केली जात होती. राऊतवाडी धबधब्याला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पर्यटकांना सुविधा पुरविण्यासाठी अर्थिक कमतरता भासू लागली आहे. त्यासाठी ग्राम समितीने प्रवेश कर आकारणीतुन मिळणाऱ्या महसुली उत्पन्नातुन स्वच्छता, कचरा संकलन, स्वच्छतागृह, चेंजींग रुममध्ये लाईट व्यवस्था आणि याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार आदीचा खर्च यातुन करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पर्यटकांना धबधब्याच्या ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -