Thursday, February 6, 2025
Homeब्रेकिंगशिर्डीला छावणीचं स्वरुप, देशाची सर्वात महत्त्वाची व्यक्ती उद्या साईचरणी लीन होणार

शिर्डीला छावणीचं स्वरुप, देशाची सर्वात महत्त्वाची व्यक्ती उद्या साईचरणी लीन होणार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या शिर्डी दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिर्डीतील घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. द्रौपदी मुर्मू या मंगळवारी संध्याकाळी नागपुरात दाखल झाल्या. त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळावर गेले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या बुधवारी गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली.

द्रौपदी मुर्मू या कालच्या दिवसभराच्या कार्यक्रमांना हजेरी लावून आज मुंबईत दाखल झाल्या. त्यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बैस हे हजर होते. त्यानंतर राजभवनावर राष्ट्रपतींसाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपतींचा हा तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा आहे. राष्ट्रपती उद्या शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील घडामोडींना वेग आला आहे. पोलीस आणि प्रशासन या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -