गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक अपघात घडले आहेत. अनेकांनी आपले जीव गमावले. अशीच एक थरारक घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. ही घटना पाहून तुम्हालाही धक्का बसेलघटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दरम्यान ही घटना दिल्लीतील एका घटनेची आठवण करून देते.
दिल्लीमध्ये एक भयंकर अपघात घडला होता, ज्यामध्ये एका कार चालकाने एका महिलेले रस्त्यावर फरफट नेलं होतं, या घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता. अशीच एक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे.रिक्षा चालकाने एका महिलेला काही किलोमीटरपर्यंत रस्त्यावरुन फरफटत नेलं, ही संपूर्ण घटना रस्त्यालगत असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. ही घटना काल (6 जुलै) रोजी घडली आहे. कोल्हापुरमधील राजारामपुरी येथे ही घटना घडली. रिक्षामध्ये साडी अडकल्यामुळे प्रवासी महिला गेली फरफटत गेली असल्याचं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक आणि संबधित महिलेमध्ये काही वेळ आधी भाड्यावरून वाद झाला होता. वाद मिटल्यानंतर रिक्षाचालक निघून जात असतानाच ही घटना घडली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेवर जवळील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहे.या प्रकरणाबद्दल रिक्षा चालकाकडे चौकशी केली असता त्याला याची कल्पना नसल्याचे त्याने सांगितले आहे. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रिक्षात साडी अडकल्यामुळे महिला फरफटत जात आहे. एक व्यक्ती जेव्हा समोरुन येऊन रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा रिक्षावाल्याने त्याकडे लक्ष दिलं नाही. शिवाय त्याच्या रिक्षामागे काही लोक पळत आहेत.