गांधीनगर मधील मोकाट फिरणाऱ्या गाढवांनी एका शाळकरी मुलीसह शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्याचा चावा घेतल्याने दोघांच्यावरही गांधीनगर वसाहत रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गांधीनगर ग्रामपंचायत आणि गांधीनगर पोलिसांच्याकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने प्रचंड नाराजी दिसत आहे. मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी मानवाधिकार संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख गणेश देवकुळे यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, करवीर तालुक्यातील गांधीनगर इथे मोकाट गाढवांचा कळप मोठ्या प्रमाणात फिरत असतो. गांधीनगर पोवार मळ्यातील मयुरी कुमार जाधव ही छत्रपती युवराज हायस्कूलमध्ये इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत आहे. ती सकाळी साडेदहाच्या दरम्यान गांधीनगर वसाहत रुग्णालयाजवळून शाळेला जात असताना गाढवाने तिच्या पायाचा चावा घेतला. तर मेघराज कॉलनीतील लक्ष्मण कुसाळे हे शेतकरी म्हसोबा रोडवरील आपल्या शेतात जात होते. ते म्हसोबा मंदिराजवळून जात असताना त्यांच्या पायाचा चावा गाढवाने घेतल्याने त्या दोघांनाही गांधीनगर वसाहत रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गांधीनगर शहरामध्ये गाढवांचे कळप मोकाटपणे फिरत असतात. यापूर्वीही गाढवांमुळे बरेच अपघात झाले आहेत. गांधीनगर ग्रामपंचायत प्रशासनाने तक्रार करूनही कोणतीही कारवाई केलेली नाही. मोकाट गाढवे आणि संबंधित मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी मानवाधिकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
गांधीनगरमध्ये गाढवाने चावा घेतल्याने दोघे जखमी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -