राष्ट्रवादीत नेते अजित पवार यांनी केलेल्या बंड केले. त्यानंतर राज्यात नव्या राजकीय घडामोडीनंतर कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतलेले कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचे शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात जल्लोषात स्वागत झाले. फटाक्यांची आतषबाजी, विजयाच्या घोषणा आणि हजारो कार्यकत्यांची मोटरसायकल रॅली अशा वातावरणात कावळा नाका येथून मिरवणूक काढण्यात आली.
ना. हसन मुश्रीफ यांच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये विविध सहकारी संस्थेमध्ये संचालक असलेल्या काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा ही समावेश होता. तर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व ना. हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते कोल्हापूरात आले. यावेळी त्यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. सोबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार, ए. वाय. पाटील व अन्य मान्यवर. कार्यकर्ते या मिरवणुकीपासून लांब व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
ना. हसन मुश्रीफ यांच्या मोटारीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर पाटील होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मंत्री मुश्रीफ यांचे कावळा नाका येथे आगमन झाले. या ठिकाणी त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी व विजयाच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. हजारो कार्यकर्ते मोटर सायकलवरून सहभागी झाले होते. राष्ट्रवादीत फाटाफूट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ३५ आमदारांच्या गटाने शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीच्या नवा आमदारांना मंत्रीपदे मिळाली आहेत. मंत्रिमंडळात हसन मुश्रीफ यांचाही सहभाग आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री मुश्रीफ हे शुक्रवारी पहिल्यांदा कोल्हापुरात आले. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली होती. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचे कोल्हापुरात आगमन झाले.
कावळा नाका येथे स्वागत करण्यात आले. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक विश्वास पाटील, बाबासो चौगुले, युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, माजी नगरसेवक राजू लाटकर, प्रकाश गवंडी, आशिष पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे आदींचा सहभाग होता. मिरवणूक मार्गावरील छत्रपती ताराराणी, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासही ना. मुश्रीफ यांनी अभिवादन केले.