Tuesday, July 8, 2025
Homeब्रेकिंगRain Update : कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार; सात बंधारे पाण्याखाली, पंचगंगेच्या...

Rain Update : कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार; सात बंधारे पाण्याखाली, पंचगंगेच्या पाणीपातळीत 4 फुटांची वाढ


पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस (Heavy Rain in Kolhapur) झाल्याने सकाळी ७ ते सायंकाळी ७ दरम्यान पंचगंगा नदीची (Panchganga River) पाणीपातळी तब्बल ४ फुटांनी वाढली. राजाराम, शिंगणापूर, रुई, इचलकरंजी, सुर्वे, तेरवाड आणि शिरोळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

चंदगड तालुक्यातील घटप्रभा मध्यम प्रकल्प काल (शुक्रवार) पहाटे ४ वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे. जिल्ह्यात दिवसभर राधानगरी, वारणा, पाटगाव आणि कुंभी धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे.

जिल्ह्यात लहान-मोठे असे एकूण १५ प्रकल्प आहेत. या एकाही प्रकल्पातून अद्याप एक क्युसेकही पाणी सोडले जात नाही. दरम्यान, सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान, राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. सकाळी ७ वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणीपातळी १४ फूट ०१ इंच होती. हीच पाणीपातळी सायंकाळी ७ पर्यंत १७ फूट २ इंचावर जाऊन पोचली.

त्यामुळे या बंधाऱ्यावरून सकाळी ६ हजार १२७ क्युसेक, तर सायंकाळी ८ हजार १५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत राहिला. जिल्ह्यात पाणलोट क्षेत्राव्यतिरिक्त इतर ठिकाणीही दमदार पाऊस झाला. त्यामुळे पेरण्यांना गती आली आहे. मृग नक्षत्राचा मुहूर्त साधून जून महिन्यात पेरणी केलेल्या भात, सोयाबीन पिकाला या पावसाने तरतरी येणार आहे. उसाला टाकलेली लागवड पोषक ठरणार असल्याचे चित्र आहे.

तुळशी धरण क्षेत्रात पावसाचा जोर धामोड : सकाळपासून येथील तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. २४ तासांत २९ मिमी इतकी पावसाची नोंद झाली आहे. केळोशी बुद्रुक येथील लोंढा नाला प्रकल्प ३५ टक्के भरला आहे. दरम्यान, तुळशी धरणातून सोडण्यात आलेला नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरणाची पाणीपातळी सध्या ५९८.९० मी असून पाणीसाठा-२४.६२६ दलघमी इतका आहे. धरण क्षेत्रात आजअखेर एकूण पाऊस – ४११ मिमी पावसाची नोंद झाली आहे.‘भोगावती’च्या पाणीपातळीत वाढराशिवडे बुद्रुक : पावसाने जोर धरल्याने रेंगाळलेल्या शेतीकामांना गती आली आहे. दीर्घकाळ रेंगाळलेली भात रोप लागण आता गतीने होणार आहे. याशिवाय डोंगरी खरीप पिकांची पेरणी झपाट्याने होऊ लागली आहे. ओढ्यांना पाणी सुरू झाल्याने भोगावती नदीची पाणीपातळीही आज वाढली आहे.

जिल्ह्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा करण्याची क्षमता आणि आजचा पाणीसाठा टीएमसीमध्ये धरण/प्रकल्प एकूण पाणीसाठा क्षमता आजचा पाणीसाठाराधानगरी ८.३६ २.६७तुळशी ३.४७ ०.८७वारणा ३४.३९ १२.२६दूधगंगा २५.३९ २.६५कसारी २.७७ ०.८२कडवी २.५१ ०.८७कुंभी २.७१ १.१३पाटगाव ३.७१ १.१८चिकोत्रा १.५२ ०.४३चित्री १.८८ ०.३३जंगमहट्टी १.२२ ०.३१घटप्रभा १.५६ १.५६जांबरे ०.८१ ०.३५आंबेओहोळ १.२४ ०.४०कोदे लघू. पा. ०.२१ ०.१३

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -