माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, अशी चिठ्ठी लिहून विवाहित तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दर्शना अर्जुन वाळवेकर (वय २२, रा.२०३, रास्कोड अपार्टमेंट, स्वामीनारायण मंदिरसमोर, वसंत बहार रोड, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात दोन दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. यानंतर आज दर्शना हिने दुपारी एकच्या सुमारास घरातील बेडरूममध्ये छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात कोणालाही जबाबदार धरू नये, कोणतीही तक्रार नाही, मुलीच्या प्रकृतीची काळजी घ्या, असेही लिहिले आहे. तिच्या माहेरच्या लोकांकडूनही सध्या तरी कोणतीही तक्रार नसल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी उपअधीक्षक अजित टिके आणि पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी भेट दिली.
कोल्हापूर:गळफास घेवून महिलेची आत्महत्या
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -