हातकणंगले : भरधाव दुधाच्या टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने टँकर सलगरे वडा पाव सेंटर व चायनीजच्या हॉटेलमध्ये घुसून दहा ते बारा लाखाचे नुकसान झाले.गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता ही घटना घडली. सुदैवाने हॉटेलमध्ये कोणीही नसल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. कोल्हापूर-सांगली मार्गाच्या अपुऱ्या व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा अपघात झाला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त हाेत आहे. अपघाताची नोंद हातकणंगले पोलीसात झाली.
टँकर चालक पंढरीनाथ यादव (मूळगाव उत्तर प्रदेश, सध्या रा. सांताक्रूझ, मुंबई) दुधाचा टँकर घेऊन जयसिंगपूरहून नाशिककडे गुरुवारी रात्री निघाला होता. तो पहाटे दोन वाजता हातकणंगले (इंचलकरंजी फाटा) येथे आला असता समोरून येणाऱ्या वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात रस्त्याकडेला असलेल्या खड्ड्यात मोठ्या दगडावर आदळला व तसाच पुढे चायनीज व सलगरे चहाच्या हॉटेलात शिरला. यामध्ये हॉटेलचे साहित्य हॉटेलचे मोठे नुकसान झाले. यामध्ये वडापाव सेंटर व हॉटेलचे मिळून १० ते बारा लाखाचे नुकसान झाले.
रस्त्याच्या दुतर्फा हॉटेल, टपऱ्या
सांगली-कोल्हापूर रस्त्याची रस्त्याची अवस्था बिकट अाहे. रस्त्याच्या दुतर्फा हॉटेल, बिअर बार व इतर व्यवसायांबरोबर टपऱ्या आहेत. यापूर्वी या रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देऊन अद्याप दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. तरी सांगली कोल्हापूर रस्ता दुरुस्त होणार कधी असा सवाल होत आहे.
दुधाचा टॅंकर हॉटेलमध्ये घुसला, हातकणंगलेतील घटनेत तब्बल ‘इतक्या’ लाखाचे नुकसान
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -