Kolhapur : आईच्या आकस्मिक निधनानंतर रक्षाविसर्जन करून घरी परतल्यानंतर वडिलांचेही निधन झाल्याने त्यांनाही त्याच दिवशी निरोप देण्याची वेळ दुर्दैवी मुलांवर आली. ही हृदयद्रावक घटना कोल्हापूर शहरात घडली.या घटनेनंतर काशिद कॉलनी, सानेगुरुजी वसाहतीमधील देशपांडे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. एका कंपनीतून अधिकारी पदावरून निवृत्त झालेल्या सदानंद देशपांडे यांच्या पत्नी सुरेखा (वय 77) यांचे रविवारी 2 जुलै रोजी निधन झाले. त्यांचे रक्षाविसर्जन मंगळवारी 4 जुलै रोजी सकाळी करण्यात आले. रक्षाविसर्जनासाठी घरी मित्रमंडळींसह नातेवाईकसुद्धा आले होते. सुरेखा देशपांडे यां दु:खाचा डोंगर असतानाच त्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजता सदानंद देशपांडे (वय 84) यांचेही आकस्मिक निधन झाले.
त्यामुळे आईचे रक्षाविसर्जन करून नदीवरून परतलेल्या त्यांच्या मुलांना त्याच दिवशी वडिलांनासुद्धा अखेरचा निरोप देण्याची वेळ आली. देशपांडे हे मुळचे आजरा तालुक्यातील आहेत. समीर देशपांडे आणि सारस्वत बँकेतील राजारामपुरी शाखेतील वरिष्ठ शाखाधिकारी शिशिर देशपांडे यांचे ते आईवडील होत.
Kolhapur News: आईचे रक्षाविसर्जन करून घरी आल्यानंतर वडिलांचंही निधन, मुलांवर दु:खाचा डोंगर, कोल्हापुरातील हृदयद्रावक घटना
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -