Thursday, July 31, 2025
Homeकोल्हापूरविजेच्या तारेच्या धक्क्याने मायलेकराचा जागीच मृत्यू

विजेच्या तारेच्या धक्क्याने मायलेकराचा जागीच मृत्यू

दरम्यान, जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील नेबापूरमध्ये शेतामधील तुटलेल्या वीजेच्या तारेचा स्पर्श होऊन माय लेकरांचा जागीच मृत्यू झाला., शेतात मुलगा नेहमीप्रमाणे काम करण्यासाठी गेल्यानंतर परत न आल्याने आई पाहण्यासाठी गेल्यानंतर त्यांनीही स्पर्श केल्याने मृत्यू झाला. नंदा गुंगा मगदूम आणि आणि त्यांचा मुलगा अजिंक्य गुंगा मगदूम अशी जागीच मृत्यूमुखी पडलेल्या मायलेकरांची नावे आहेत.

अजय नेहमी सकाळच्या सुमारास शेतात जातो. नेहमीच्या सवयीने तो आजही शेतात कामासाठी सकाळी सातच्या सुमारास गेला होता. तासभर काम करून घरी परतणारा मुलगा अजय अजून कसा घरी परतला नाही? या चिंतेत असलेल्या आईने मुलगा फोन केला. मात्र, फोन न उचलल्याने त्या पाहण्यासाठी शेतात गेल्या. शेतात अजय पडल्याचे दिसून आल्यानंतर आई नंदा यांनी अजयला उचलण्याच्या नादात स्पर्श केला असावा आणि त्यांनाही वीजेचा धक्का बसला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -