ताजी बातमी ऑनलाईन टीम
ती घरात यायची आणि बायकोला त्याच्या समोरंच विचारायची तुला मुल कधी होणार गं..मग त्याची तगमग सुरु व्हायची. त्याच्या पौरुषत्वाला ते आव्हान दिल्यासारखं वाटायचं, त्याने मग रोजच्या टोमण्यांनी त्याचं टाळकं सटकायचं.. अखेर या टोमणेबाजीला कंटाळून त्यानं अखेर टोकाचं पाऊल उचललं. त्याच्या हातून माणूसकीला काळीमा फासणारं भयंकर कृत्य घडलं आणि त्याला तुरुंगात जावे लागले. परंतू त्यानं आपल्या पत्नीलाही जेलमध्ये टाका असं पोलीसांनी विनवणी करताना सांगितलं..कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल…
आपली रिक्षा चालवून उपजीविका करणारा रॉबिन उर्फ मुन्ना याचं लग्न होऊन बरीच वर्षे झाली तरी त्याला काही मुल झालं नव्हतं. त्यामुळे त्याने अनेक उपाय करुन पाहीले, परंतू काही फरक पडला नाही. मगं काय त्याचे जीवन असंच सुरु होते. परंतू त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबातील सुरिंदर कौर ही महिला सारखी त्याच्या बायकोशी गप्पा मारायला यायची आणि रोज तोच प्रश्न विचारची तुला मुलबिल काय होणार आहे की नाही..हा प्रश्न नेमका मुन्ना याच्या समोरच ती विचारायची. मग त्याचं टाळकं सटकायचं. त्याच्या पौरुषत्वाला ते खिजगवल्या सारखं वाटायचं मग एक दिवस भयानक घडलं.
रॉबिनने खूपच खालच्या भाषेत…
त्या दिवशी गुरुवारी सकाळी पुन्हा शेजारीण घरी आली आणि त्याच्या बायकोला म्हणाली की मुल होण्यासाठी अमक्या डॉक्टरला दाखव, किती दिवस सहन करणार आहेस..त्याने रॉबनचा पारा एकदमच चढला त्याने सरळ तिला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यामुळे भांडण वाढत गेलं, सुरींदर कौर हीच्या रोजच्या टोमण्यांनी कंटाळलेल्या रॉबिनने तिला खूपच खालच्या भाषेत शिवीगाळ केल्याने वैतागलेल्या तिच्या नवऱ्याने आणि सासूने हस्तक्षेप करीत त्याला मारायला सुरुवात केली. त्यानंतर रॉबिन याने संतापाच्या हातोड्याने तिघा वयस्कांची हत्या केल्याचे म्हटलं जात आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने गॅसच्या व्हॉल्व ओपन करीत घरात गॅस पसरविला आणि माचिसच्या काडीने भडका केला.
माझ्या पत्नीलाही अटक करा
सुरिंदर कौर, तिचा नवरा चमनलाल आणि सासू यांच्या हत्ये प्रकरणात रॉबिनला अटक झाली. त्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नव्हता. त्याने म्हटलं की माझ्या पत्नीलाही माझ्यासोबत अटक करा कारण माझ्याशिवाय तिचा सांभाळ करणारं जगात कोणीच नाही. पंजाबच्या लुधियानात ही भयंकर घटना घडली आहे. पोलीसांनी हातोड्याला पाहीले तर तो स्वच्छ केलेला आढळला, परंतू युव्ही लाईटमध्ये त्यावर रक्ताचे डाग दिसले.
मुल होत नाही म्हणून ती सारखी टोमणे मारायची, मग त्याने माणूसकीला लाजवणारं कृत्य केलं
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -