ताजी बातमी ऑनलाईन टीम
धार्मिक दृष्टिकोनातून श्रावण महिना हा भक्तीसाठी अनुकूल व समर्पित समजला जातो. यंदा हा पवित्र पर्वकाळ तब्बल २ महिन्यांचा असणार आहे. तब्बल १९ वर्षांनी असा शुभसंयोग येत आहे. यंदा अधिक मास असल्याने श्रावण महिना तब्बल २ महिन्याचा राहणार आहे. यावर्षी ८ श्रावणी सोमवार येत आहेत. धार्मिक दृष्टिकोनातून हा विशेष पर्वकाळ असल्याचे मानले जात आहे.
श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे. या पवित्र महिन्यात भगवान शिवाची पूजा केली जाते. तर अधिक महिना (Adhik Maas 2023) हा भगवान श्रीविष्णूंना समर्पित आहे. हे दोन्हीही शुभसंयोग यावर्षी श्रावण महिन्यातच आले आहेत. अधिक श्रावण आणि निज श्रावण असे दोन महिने श्रावण पर्वकाळ असणार आहे.
हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिना १८ जुलै २०२३ पासून सुरू होईल आणि १५ सप्टेंबर पर्यंत चालेल. म्हणजेच यावेळी एकूण ५९ दिवस भाविकांना भगवान शंकराची आराधना करण्याची संधी मिळणार आहे. १९ वर्षांनंतर हा शुभ संयोग घडल्याचे सांगितले जात आहे. यावेळी १८ जुलै ते १६ ऑगस्ट दरम्यान अधिकमास असेल. म्हणजेच या वेळी श्रावणामध्ये भगवान शंकरासोबतच भगवान विष्णूचाही आशीर्वाद मिळणार आहे.
तब्बल १९ वर्षांनी शुभसंयोग: यंदा श्रावण २ महिन्यांचा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -