Thursday, February 6, 2025
Homeब्रेकिंगराष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार? शरद पवारांचं नाव घेत पृथ्वीराज चव्हाण यांचं...

राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार? शरद पवारांचं नाव घेत पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर सत्ताधारी भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत शरद पवारांना शह दिला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहेत. त्यामुळे आता राज्याच्या राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळंतय. अशातच आता माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणयांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लोकसत्ताशी बोलताना त्यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं आहे.

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
अजित पवार यांच्या बंडानंतर आता शरद पवार आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, अशी सोशल मीडियावर चर्चा होत तरी देखील तशी शक्यता ‘लगेच’ दिसत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर त्यांना संसदीय मंडळात सामावून घेतलं जाऊ शकतं, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवारांना ऑफर दिली की काय? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे. समाजमाध्यमांवर होत असलेल्या चर्चेला त्यांनी नकार दिला नसल्याने आता सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी राहुल गांधी यांच्यावर देखील नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी यांनी फार आक्रमकपणे तरुणांकडे नेतृत्व दिलं. मात्र, ते यशस्वी झाले असं म्हणता येणार नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीवर त्यांनी भाकित वर्तविलं आहे. आगामी काळात राज्यात काँग्रेस आणि भाजपा अशीच लढत होईल. आणि द्विपक्षिय पद्धत अस्तित्वात येईल, असंही चव्हाण म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसेनेबाबत जे घडलं तेच राष्ट्रवादी काँग्रेसबाबत घडलं. पक्षफुटीचं राजकारण मी अनेकदा पाहिलेलं आहे. छोट्या-मोठ्या प्रमाणात लोक येतात अन् जातातही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीचं काय होणार? शरद पवार यांची भूमिका काय? असा सवाल काँग्रेसकडून विचारले जात होते. त्यावर शरद पवारांनी महाविकास आघाडीची साथ मजबूत राहिल, असं वक्तव्य केलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -