Sunday, July 27, 2025
Homeक्रीडापावसामुळे वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया पहिली टेस्ट रद्द?

पावसामुळे वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया पहिली टेस्ट रद्द?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर विश्रांतीवर होती. या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर टीम इंडिया आता वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया या दौऱ्यात विंडिज विरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. पहिला कसोटी सामन्याला येत्या 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे. विशेष बाब म्हणजे टीम इंडिया या कसोटी मालिकेतून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 मोहिमेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ही कसोटी मालिका महत्वाची आहे.

टीम इंडियाने पहिल्या कसोटीसाठी नेट्समध्ये जोरदार सराव केलाय. दोन्ही संघांच्या खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांना उत्सूकता लागून राहिलीय. पहिला सामना हा डोमिनिका इथील विंडसर पार्क इथे खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. या पहिल्या सामन्यावर पावसाचं सावट आहे.

सामना रद्द होणार?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या पहिल्या सामन्यात पाऊस होऊ शकतो. सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाऊस होण्याचा अंदाज आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी हवामान कोरडे असेल. तर चौथ्या आणि पाचव्या दिवशी पुन्हा पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, तर क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड होऊ शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -