Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगमुख्यमंत्र्यांच्यासमोर आज अडचणींचा डोंगर, आधी धुळे विमानतळ, मग फागणे गाव, नेमकं काय...

मुख्यमंत्र्यांच्यासमोर आज अडचणींचा डोंगर, आधी धुळे विमानतळ, मग फागणे गाव, नेमकं काय घडलं?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे असलेल्या अडचणी कमी नाहीत. विरोधक सातत्याने त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यांच्यावर विरोधकांकडून नेहमी टीका केली जातेय. असं असताना आज अनपेक्षित अशी घटना समोर आली आहे. एकनाथ शिंदे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री धुळ्याला पोहोचले, पण तरी त्यांचं विमान तिथे लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना धुळ्याहून जळगाव विमानतळावर जावं लागलं. तिथून ते रस्ते मार्गाने धुळ्याच्या दिशेला जाऊ लागले. पण तरीही एकनाथ शिंदे यांच्यामागे लागणाऱ्या अडचणी काही सूटत नाहीत. एकनाथ शिंदे यांचा ताफा धुळ्याच्या दिशेला जात असताना फागणे गावाजवळ एका अज्ञात व्यक्ताने काळे झेंडे दाखवले. त्यामुळे वातावणात काही काळासाठी तणाव निर्माण झाले होते.

एकनाथ शिंदे यांचं विमान धुळ्याला आलं तेव्हा खराब वातावरण होतं. त्यामुळे धुळे विमानतळाकडून त्यांना सिग्नल मिळू शकला नाही. विशेष म्हणजे धुळे विमातळाचं सिग्नल मिळावं यासाठी मुख्यमंत्र्यांचं विमान आकाशात घिरट्या मारत होतं. पण तरीही सिग्नल मिळू शकलं नाही. त्यामुळे अखेर हे विमान जळगावच्या दिशेला न्यावं लागलं. तिथे लँड केल्यानंतर मुख्यमंत्री रस्ते मार्गाने धुळ्याला पोहोचले.

विशेष म्हणजे या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील असल्याची माहिती मिळत आहे. या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडत आहे. पण या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच काही अनपेक्षित घटना घडल्या. सर्वात पहिली घटना म्हणजे धुळे विमानतळावर मुख्यमंत्र्यांचं विमान लँड होऊ शकलं नाही. ते रस्ते मार्गाने आता येत आहेत. तर दुसरं म्हणजे फागणं गावाजवळ एका अज्ञाताने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.

काळे झेंड दाखवणाऱ्याला पोलिसांनी पकडलं
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणाऱ्या अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी पकडलं आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळीच याबाबत इशारा दिला होता. मुख्यमंत्री धुळ्यात आले तर त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करु, असा इशारा धुळ्यातील ठाकरे गटाच्य कार्यकर्त्यांनी दिला होता. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. तसेच त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, दिवसभरातील या सगळ्या घडामोडींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याला उशिर झालाय. ते उशिरा कार्यक्रमस्थळी दाखल झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -