Friday, February 7, 2025
Homeब्रेकिंगसचिनसाठी पाकिस्तानच्या 'सीमा'ने अशी पार केली भारताची 'सीमा'...'या' मार्गाने भारतात सहज प्रवेश

सचिनसाठी पाकिस्तानच्या ‘सीमा’ने अशी पार केली भारताची ‘सीमा’…’या’ मार्गाने भारतात सहज प्रवेश


पबजी पार्टनरचं प्रेम मिळवण्यासाठी पाकिस्तानातल्या कराचीमधून सीमा हैदर नावाची महिला भारतात पळून आली. भारतात तिला अटक करण्यात आली. सीमाचा पहिला पती गुलाम हैदर याने पुन्हा घरी म्हणजे पाकिस्तानमध्ये परतण्याची विनंती तिला केली आहे. तर प्रयागराजमध्ये राहाणारा सचिनने सीमा आपल्यासोबत राहावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. काठमांडूतल्या एका मंदिरात सचिनबरोबर लग्न केल्याचा दावा सीमा हैदरने केला आहे. ती आता पुन्हा पाकिस्तानात जाऊ इच्छित नाही. तर दुसरीकडे तिचा पहिला पती गुलाम हैदरने थेट पीए मोदी यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे.

सीमा कशी आली भारतात?
पाकिस्तानमधल्या कराची इथली सीमा हैदर अवैध मार्गाने नेपाल बॉर्डर पार करुन भारतात आली. चार मुलांबरोबर भारतात आलेली सीमी सध्या चांगलीच चर्चेत आहे. पण प्रश्न असा आहे की नेपाळ बॉर्डरमागे इतक्या सहज भारतात प्रवेश करता येतो का? अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने केलेल्या एका अहवालानुसार नेपाळची सीमा भारतात प्रवेश करण्यासाठी गुप्तचरांचा सर्वात आवडता मार्ग आहे. काही दिवसांपूर्वी खलिस्तानी अमृतपाल गायब झाला होता. त्यावेळी तो नेपाळमध्ये लपल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अनेक दहशतवादी संघटांनां भारतात गुन्हेगारी कारवाया करायच्या आहेत. यातले जवळपपास सर्वच दहशतवादी भारतात येण्या-जाण्यासाठी नेपार सीमेचा वापर करतात.

भारत आणि नेपाळमध्ये अठराशे किलोमीटरची सीमा आहे. भारत-नेपाळ सीमेवर उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्किम ही राज्य येतात. यातला मोठा भाग हा ओपन बॉर्डर म्हणून घोषित करण्यात आला आहे. विश्वासार्हतेच्या मुद्द्यावर हा करार करण्यात आला. या भागात इतर भागांप्रमाणे कडक सुरक्षा व्यवस्था नसते. इतकंच नाही या रस्त्यावर काटेरी तारांचं कुंपनही टाकण्यात आलेलं नाही. याला शांतता आणि मैत्रीचा करार असं नाव देण्यात आलं आहे.

भारत आणि नेपाळमध्ये सलोख्याचे आणि सांस्कृतिक संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये रोटी-बेटीचं नातं आहे. दोन्ही देशातील नागरिकांची ये-जा सुरु असते. हे नातं कायम राहावं यासाठी 1950 साली ओपन बॉर्डर करण्यात आली. पाकिस्तानी महिला सीमा हैदर याच मार्गाने आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी भआरतात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -