ताजी बातमी ऑनलाईन टीम
श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील काही श्रीपूजक नियमित दानपेटी शिवाय व्यक्तिगतरीत्या बेकायदेशीरपणे दुसरे दानपात्र ठेवत आहेत. या दानपात्रांमध्ये मंदिरात येणाऱ्या
भाविक भक्तांकडून दररोज हजारो रुपयांची रक्कम जमा होते. मात्र ही रक्कम देवस्थान समितीकडे न जमा करता किंवा मंदिरासाठी न खर्च करता दानपात्र ठेवणारी मंडळी परस्पर हडप करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरातील बेकायदेशीरपणे ठेवण्यात आलेली दानपात्र काढण्यात यावी यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.
एवढ्या आंदोलकांनी दानपात्र काढणार नसाल तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने देखील दानपात्र ठेवण्यासाठी परवानगी द्या असं म्हणत संभाजी ब्रिगेडचे दानपात्र घेऊन मंदिरात घुसण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. मात्र यावेळी महाद्वार चौकात
आंदोलकांना जुना राजवाडा पोलिसांनी अडवून धरलं. त्यामुळे महाद्वार चौकातच आंदोलकांनी काही गाठी आंदोलन करणे जोरदार घोषणाबाजी केली.
कोल्हापूर ; अंबाबाईच्या मंदिरातील बेकायदेशीर दानपात्र काढूनटाकण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे आंदोलन
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -