चिमुकल्या सात वर्षांच्या बालिकेसह मातेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल (ता. १०) कित्तूरजवळ दिंडलकोप्प येथे घडली. महादेवी इंचल (वय ३४) असे मातेचे नाव आहे, तर चांदणी इंचल (वय ७) मृत बालिकेचे नाव आहे.याबाबत माहिती अशी, कौटुंबिक कलह आणि सातत्याने कुटुंबाचा जाच सहन न झाल्याने टोकाची भूमिका घेऊन महादेवी हिने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. गोकाक येथील जवानाशी महादेवी हिचा विवाह झाला होता.
मात्र, सात वर्षांपूर्वी पतीचे अकाली निधन झाले.त्यामुळे महादेवी मुलीसह माहेरी राहण्यासाठी दिंडलकोप्पला आली होती. कौटुंबिक वाद व मतभेदामुळे ती काही दिवस अस्वस्थ होती. त्यातूनच तिने आज मुलीसह जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कित्तूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलीकुटुंबातील मतभेद लक्षात घेऊन महादेवी स्वतंत्र राहण्यासाठी प्रयत्न करत होती. मात्र, घरच्या लोकांनी त्याला आक्षेप घेऊन विरोध दर्शविला. कुटुंबाचा त्रास व जाचामुळे महादेवीने जीवनाची अखेर केल्याचे पोलिसांनी सांगितले.