युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केल्याने एका सबस्क्रायबरला 150 रुपये मिळतील, असा विश्वास संपादन करून प्रगती महेश कुरणे (वय 36, सध्या रा. दुसरी गल्ली, जयसिंगपूर, मूळ गाव नदीवेस, मिरज) या बँक कर्मचारी महिलेची 18 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञातावर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना 20 जून ते 30 जून या कालावधीत घडली.
प्रगती कुरणे यांना अज्ञात मोबाईलधारकाने 20 जून ते 30 जूनच्या दरम्यान फ्री टास्क अॅप वापरून यू ट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केल्याने एका सबस्क्रायबरला 150 रुपये मिळतील, असे सांगितले. सुरुवातीला फ्री टास्क अॅप वापरल्यावर कुरणे यांना 650 रुपये पाठवून विश्वास संपादन केला. प्रिपेड टास्क अॅप वापरल्यास जास्त पैसे मिळतील, असे आमिष दाखवले.
त्यानंतर कुरणे यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून आरटीजीएस, एनईएफटी, यूपीआय व बँक ऑफ इंडियाच्या मोबाईल अॅपमधून संशयिताच्या वेगवेगळ्या बँक खात्यावर 18 लाख 60 हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले. त्यानंतर ही रक्कम कमिशनसह परत देते, असे सांगून फसवणूक केली.
बँक कर्मचारी महिलेची 18.60 लाखांची फसवणूक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -