Thursday, July 31, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरातून गोव्याला जायचे, फिरण्यासाठी बाईक भाड्याने घ्यायचे अन् ओएसएक्सवर विकायचे !

कोल्हापुरातून गोव्याला जायचे, फिरण्यासाठी बाईक भाड्याने घ्यायचे अन् ओएसएक्सवर विकायचे !

कोल्हापूर : हल्ली वाहन चोरींच्या घटनांमध्ये खूप वाढ झाली आहे. चोरटे चोरीसाठी काय करतील याचा नेम नाही. कोल्हापुरमध्ये उघडकीस आलेली घटना पाहून सर्वच अवाक् झाले आहेत. वाहनचोरीसाठी चोरट्यांची मो़डस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावून गेले. कोल्हापुरमधील दोघे चोरटे गोव्यातून बाईक चोरायचे आणि कोल्हापुरात आणून ओएसएक्सवर विकायचे. याप्रकरणी गोवा पोलिसांनी कारवाई करत दोघांनाही कोल्हापुरातून बेड्या ठोकल्या आहेत. सद्दाम जामदार असे मुख्य आरोपीचे नाव आहे. सद्दामला याआधीही अशा गुन्ह्यात अटक झाली होती. काही दिवसांपूर्वीच तो जामीननावर सुटला होता. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.फेक लायसन्सद्वारे बाईक भाड्याने घ्यायचा
सद्दाम जामदार हा गोव्याला फिरण्याच्या बहाण्याने जायचा. तेथे बनावट लायसन्सच्या आधारे फिरण्यासाठी भाड्याने बाईक घ्यायचा. मग ती बाईक घेऊन थेट कोल्हापुरात यायचा. तेथे बाईकचा नंबर बदलायचा आणि ओएलएक्सवर विकायचा. ग्राहकाने बाईक परत न दिल्याने बाईकच्या मालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. गोवा पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला.

सद्दामने याआधीही चार बाईक चोरुन विकल्या
तपासादरम्यान पोलिसांना कोल्हापुरातील सद्दाम जामदार हा सराईत गुन्हेगार अशा प्रकारे बाईक चोरुन नेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत सद्दामसह त्याच्या साथीदाराला कोल्हापुरातून बेड्या ठोकल्या. सद्दाम याआधी अशा प्रकारे चार बाईक गोव्यातून कोल्हापुरात आणून फेक नंबर प्लेट लावून विकल्या होत्या. सद्दाम हा सराईत चोरटा आहे. याआधीही तो बाईक चोरीच्या गुन्ह्यात तुरुंगात गेला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -