जुलै महिना उलटला तरीही पावसानं समाधानकारक हजेरी लावलेली नाही. मान्सून लांबल्याने भाज्या महागल्यात. बाजारातील भाजीपाल्याची आवक घटली आहे. सर्वच भाज्या 40 ते 50 रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत. टोमॅटोचे दर तर 100 रुपये प्रति किलो इतके झाले आहेत. त्यातच कोथिंबीरदेखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. कोथिंबीरची एक जुडी शंभरच्यावर गेली आहे. याच कोथिंबीरने नाशिकमधील शेतकऱ्याला एका दिवसात लखपती बनवले आहे. शेतकऱ्याने पिकवलेल्या कोथिंबीरला एकरी 2 लाखांचा भाव मिळाला आहे. विशेष म्हणजे शेतातच ही डील झाली आहे.
व्यापाऱ्याने शेतात येवून खरेदी केली कोथिंबीर
निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील उंबरखेड येथील राजेंद्र निरगुडे या शेतकऱ्याच्या कोथिंबीरीला एकरी दोन लाख रुपयांचा दर मिळाला आहे. द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात या शेतकऱ्याने कोथिंबीरीचे पीक घेतले होते. मात्र, मजुरी आणइ पावसाचा अंदाज पाहून या शेतकऱ्यांने व्यापाऱ्याला जागेवरच कोथिंबीर देऊन टाकल्याने व्यापाऱ्याने एकरी दोन लाख रुपये या शेतकऱ्याला दर दिला आहे.
टॉमेटोला कमी भाव मिळाला म्हणून शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले
एकीकडे टोमॅटो दर दीडशेच्या वर गेलेला असताना साताऱ्यातील फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये टॉमेटोला योग्य भाव मिळत नसल्याने चिडलेल्या एका शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सागर देशपांडे असं या शेतकऱ्याचे नाव असून तो काही टॉमेटोची कॅरेट घेवून या बाजार समिती मध्ये आला होता. यावेळी त्याला बाजार समिती मध्ये दलाला कडून 60 किलोचा भाव देण्यात आला यावर चिडलेल्या या शेतकऱ्याने बाहेर रस्त्यावर किरकोळ विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना 60 रुपये पावशेर टॉमेटोला भाव मिळतो आहे. मग आमच्या टॉमेटोला किलोला 60 रुपये भाव देवून आमची चेष्टा केली जाते आहे असा आरोप करत या शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. या शेतकऱ्याने काही नागरिकांना या बाजार समितीत आणलेला माल फुकट देखील वाटून टाकला. शेतात काम करणाऱ्या महिलांची मजुरी देण्यासाठी सुद्धा पैसे नसल्याचे या शेतकऱ्याने सांगितले आहे. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने बाजार समितीत गोंधळ घातला म्हणून या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
कोथिंबीरने नाशिकमधील शेतकऱ्याला एका दिवसात बनवले लखपती, एकरी 2 लाखांचा भाव; शेतातच झाली डील
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -