‘सूर्योदय स्मॉल फायनान्स बँके’चे (Suryoday Small Finance Bank) तुम्ही कस्टमर असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक येत्या 1 ऑक्टोबरपासून एटीएम सेवा (ATM Service) बंद करत आहे. तांत्रिक अडचणींमुळे (Technical Issue) बँकेनं हा निर्णय घेतल्याचं समजतं. मात्र, कस्टमर आपलं डेबिट कार्डचा इतर बँकांच्या एटीएममध्ये वापर करू शकतात, असं बँकेच्या सूत्रांनी माहिती दिली आहे
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेनं दिलेली माहिती अशी की, कस्टमर आपल्या बँकेचं एटीएम / डेबिट कार्ड (ATM/ Debit Card)सुरू ठेवू शकतात. आपल्या बँकेचं कार्ड इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून (ATM) पैसे काढू शकतात. तसेच बँकिंग सेवांसाठी (other banking service) कस्टमर इंटरनेट बँकिंग (Internet Banking) आणि मोबाईल बँकिंगचा वापर करू शकतात. पिन बनवणे, निधी हस्तांतरण, मिनी स्टेटमेंट, बॅलन्स तपासणे इत्यादी इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगद्वारे (Mobile Banking) उपलब्ध होतील.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आर.भास्कर बाबू यांनी सांगितले की, आमच्या बँकेच्या एटीएम केंद्रांवर कस्टमर्सकडून हवा तसा वापर होताना दिसत नव्हता. त्यामुळे एटीएम केंद्रे (ATM Centers) सुरु ठेवणं व्यवहार्य नव्हतं. त्यामुळे आम्ही बँकेची एटीएम केंद्रे बंद करुन त्याऐवजी ग्राहकांना इतर बँकांच्या एटीएम केंद्रांवर मोफत सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अलीकडच्या काळात डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. रोख पैसे काढण्याचे प्रमाण घटले आहेत. दरम्यान, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेकडे 30 जूनपर्यंत एकूण 555 बँकिंग आउटलेट होते, त्यापैकी 97 लायबिलिटी फोकस आउटलेट होते. 30 जून रोजी एकूण कर्मचारी संख्या 5,072 होती.
दुसरीकडे, 1 ऑक्टोबरपासून एटीएम/डेबिट कार्ड वार्षिक देखभाल शुल्क 125 रुपये अधिक जीएसटी असणार आहे. 1 ऑक्टोबर 2021 आणि 30 सप्टेंबर 2022 या कालावधीसाठी हे शुल्क लागू असतील. याशिवाय, पोस्टाकडून आता आपल्या डेबिट कार्डधारक ग्राहकांकडून एसएमएस अलर्टसाठी 12 रुपये (जीएसटीसह) आकारले जातील. हे शुल्क डेबिट कार्डधारकांना पाठविलेल्या एसएमएस अलर्टसाठी वार्षिक शुल्क असेल.
‘या’ बँकेत अकाउंट असेल तर सावधान! 1 ऑक्टोबरपासून बंद होणार ATM
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -