Thursday, October 3, 2024
Homenewsआता केवळ 700 रुपयांत मिळणार नवा LPG सिलिंडर! किंमत कमी होईल की...

आता केवळ 700 रुपयांत मिळणार नवा LPG सिलिंडर! किंमत कमी होईल की वजन?



इंडियन ऑईलनं (Indian Oil) ग्राहकांसाठी खूशखबर दिली आहे. ग्राहकांना आता नव्या LPG सिलिंडरचा लाभ मिळणार आहे. ग्राहकांना सुविधेच्या दृष्टीकोनातून ‘कॉम्पोजिट सिलिंडर’ (Composite Cylinder) लॉन्च करण्यात आले आहे. ‘कॉम्पोजिट सिलिंडर’मुळे घरगुती LPG सिलिंडरचं वजन 7 किलोग्रॅमने कमी होणार आहे. विशेष म्हणजे कॉम्पोजिट सिलिंडर (Composite Cylinder Launch) दिसायला देखील आकर्षक आहे. इतकंच नाही तर सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे देखील ग्राहक पाहू शकणार आहेत. देशाचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Petroleum Minister Dharmendra Pradhan) यांच्या हस्ते नुकतंच कॉम्पोजिट सिलिंडरचं लोकार्पण करण्यात आलं.

खासदार हेमा मालिनी (MP Hema Malini) यांच्या हस्ते कॉम्पोजिट सिलिंडर मथुरेत (Mathura) 25 सप्टेंबरला लॉन्च करण्यात आले. कॉम्पोजिट सिलिंडरची किंमत 700 रुपये असेल. मात्र, ग्राहकांना 4 किलोग्रॅम गॅस कमी मिळेल. कारण कॉम्पोजिट सिलिंडरमध्ये केवळ 10 किलोग्रॅम गॅस मिळेल. जुन्या घरगुती सिलिंडरचं वजन 17 किलो होतं आणि गॅस भरल्यानंतर ते 31 किलो होत होतं.

मिळालेली माहिती अशी की, कॉम्पोजिट सिलिंडर 10 किलो आणि 5 किलोमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 10 किलो गॅस सिलिंडरसाठी जवळपास 700 रुपये तर 5 किलो सिलिंडरसाठी 363 रुपये मोजावे लागतील. त्याचबरोबर कॉम्पोजिट सिलिंडर मिळवण्यासाठी गॅस एजन्सीकडे सिक्युरिटी डिपॉझिट जमा करावी लागणार आहे. 10 किलोच्या सिलिंडरसाठी 3350 तर 5 किलोच्या सिलिंडरसाठी 2150 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट जमा करावी लागेल. विषेश म्हणजे ग्राहकांना आपले जुने सिलिंडर देऊन कॉम्पोजिट सिलिंडर बदलता येणार आहे.

कॉम्पोजिट सिलिंडर सध्या देशातील 28 शहरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात अहमदाबाद, अजमेर, अलाहाबाद, बंगळुरू, भुवणेश्वर, चंदीगड, चेन्नई, कोयंबत्तूर, दार्जिलिंग, दिल्ली, फरिदाबाद, गुरुग्राम, हैदराबाद, जयपूर, जालंधर, जमशेदपूर, लुधियाना, म्हैसूर, पाटणा, रांची, रायपूर, सुरत, तिरुचिरापल्ली, तिरुवल्लूर, तुमकूर, वाराणसी आणि विशाखापट्टनम् या शहरांचा समावेश आहे.

कसा बनवण्यात आला कॉम्पोजिट सिलिंडर?
सध्या वापरात असलेल्या LPG कॉम्पोजिट सिलिंडर स्टिलचा आहे. कॉम्पोजिट सिलिंडरची रचना सुरक्षिततेच्या दृष्टीनं बनवण्यात आली आहे. तीन स्तरांनी बनला आहे. पहिला स्तर हाय डेंसिटी पॉलिथिलीचा आहे. आतचा थर पॉलिमरपासून बनवलेल्या फायबर ग्लासचा आहे. तर बाहेरील भाग हा एसडीपीआयचा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -