Friday, February 7, 2025
Homeइचलकरंजीबंद घराचे कुलूप उचकटून ५४ हजाराची रोकड लंपास!

बंद घराचे कुलूप उचकटून ५४ हजाराची रोकड लंपास!

इचलकरंजी, येथील जवाहरनगर परिसरात बंद घराचे कुलूप उचकटून चोरट्याने लोखंडी कपाटातील ५४ हजाराची रोकड लंपास केली. या प्रकरणी इम्तियाज मेहबुब खाटीक (वय ३९ रा. म्हसोबा गल्ली) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, जवाहरनगर येथील म्हसोबा गल्ली येथे इम्तियाज खाटीक हे १० जुलै रोजी कुटुंबासह परगावी गेले होते. ते रात्री घरी परतले असता त्यांना घराचा कडी- कोयंडा उचकटण्यात आल्याचे दिसून आले. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता चोरट्यांनी लोखंडी कपाट तोडून ५४ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याचे स्पष्ट झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -