Monday, July 28, 2025
Homeसांगलीआयशर ट्रकची कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक; चालक जागीच ठार

आयशर ट्रकची कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक; चालक जागीच ठार

सांगली मार्गावर प्रकाश हॉस्पिटलजवळ अचानक वळालेल्या कंटेनरला पाठीमागून आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत चालकाचा जागीच मृत्यू झाला. लिंगाप्पा बिरू माने (वय ४० रा. जुना बुधगाव रोड, लक्ष्मीनगर, सांगली) असे मृत आयशर ट्रक चालकाचे नाव आहे. सोमवारी रात्री उशिरा अपघात घडला.

याप्रकरणी अज्ञात कंटेनर चालकाच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मृत चालकाचा भाऊ बाळू बिरू माने यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आयशर ट्रक (एमएच १० – डीटी – ८४४८) हा सांगलीकडून इस्लामपूरकडे येत होता.

इस्लामपूर रस्त्यावर प्रकाश हॉस्पिटलच्या परिसरात अचानक एका अज्ञात चालकाने त्याचा कंटेनर (एनएल ०१ एडी १८८९) हा रस्त्याच्या कडेला वळवला. त्यावेळी पाठीमागून येणारा लिंगाप्पा माने यांचा आयशर ट्रक त्या कंटेनरला जोराचा धडकला. यात लिंगाप्पा माने याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद इस्लामपूर पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -