Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगशिरोळ तालुक्यास महापुराची भीती!

शिरोळ तालुक्यास महापुराची भीती!

सध्या शिरोळ तालुक्यात पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावल्याने आणि पाणी पातळीत वाढ होत असल्याने नागरिकांना महापुराची भीती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे अलमट्टी धरणातून एक लाख लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे महापुराच्या पार्श्वभूमीवर दिलासा मिळत असल्याचे चित्र सध्या शिरोळ तालुक्यात दिसून येत आहे.

दरम्यान अलर्ट मोडवर असून पहिल्या टप्यातील नागरिकांना धोका ओळखून नोटीसा देण्याचे काम सुरू असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. राधानगरी धरणाचे रात्रीपासून पाच दरवाजे खुले होते मात्र सकाळी एक दरवाजा बंद झाल्याने चार दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या तेरवाड बंधाऱ्यावर ५६ फूट ५ इंच इतकी पाण्याची पातळी असून शिरोळ बंधाऱ्यावर ५० फूट ६ इंच, यादव फुल ५० फूट ६ इंच तर कुरूंदवाड – शिरढोण पुलावरून ४ फूट पाणी वाहत आहे. बुधवारी रात्री व गुरुवारी दिवसभर पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने शिरूर तालुक्यातील नागरिकांच्यामध्ये महापुराची भीती निर्माण
झाली आहे.

पुन्हा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होणार का ? असा सवाल उपस्थित होत असून कर्नाटक राज्यानेही महाराष्ट्रातील सीमाभागातील गावांना दिलासा दिला असून अलमट्टी धरणातून सुरू केला आहे. लाख क्युसेकने विस त्यामुळे शिरोळ तालुक्यातील जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे. दरम्यान शिरोळ तालुक्यात ११ बोटींच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील विविध गावात गस्त घालण्याचे काम सुरू अ 5 आहे. सध्या शिरोळ तालुक्यातील पंचगंगा व कृष्णा नदी काठावर असलेल्या नागरिकांच्याबरोबर शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गट विकास अधिकारी शंकर कवितके यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी भेट घेऊन पूर परिस्थितीचा अंदाज घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -