Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीपंचगंगा पाणी पातळीत संथगतीने वाढ!

पंचगंगा पाणी पातळीत संथगतीने वाढ!

इचलकरंजी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असली तरीही पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथगतीने वाढ होत असून हे पाणी आता परिसरात पसरू लागले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने, पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. बुधवारी पंचगंगेची पाणी पातळी स्थिर असली तरी, तीन इंचाने पाणी पातळी वाढली आहे. पंचगंगा पाणी पातळी चाळीस फूट आठ इंच इतकी झाली आहे. शुक्रवारपासून भारतीय हवामान खात्याने पुन्हा जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे आज शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे.

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसात पावसाचा जोर काहीसा कमी राहिल्याने पंचगंगेची पाणी पातळी स्थिर होती. मात्र आज गुरुवारी सकाळपासूनच पावसाचा वाढल्याने पुन्हा एकदा पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये तीन इंचाने वाढ झाली आहे. सायंकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी ४० फूट ८ इंचावर पोहोचली होती. तर जिल्ह्यातील ८१ बंधारे पाण्याखाली आहेत.
राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाल्यानंतर पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र पंचगंगेच्या पाणी पातळीत अधिकची वाढ न झाल्याने, काही अंशी दिलासा मिळाला आहे.

विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासूनच पुन्हा हजेरी लावली. पावसाने पुन्हा हजेरी लावली असली तरी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत २४ तासात केवळ ४ इंचाची वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी गुरूवारी सायकाळी ६ वाजेपर्यंत ६५.५ फूट इतकी झाली होती. गुरुवारी दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -