Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंग29 जुलैपर्यंत महाराष्ट्रसह 20 राज्यात पावसाचा कहर, ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी

29 जुलैपर्यंत महाराष्ट्रसह 20 राज्यात पावसाचा कहर, ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी

महाराष्ट्रासह देशातील बहुतेक राज्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. मागच्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित केले आहे.

याच दरम्यान भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह काही भागात रेड अलर्ट झाली केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो हवामान विभागाने हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांत हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्येही अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 3-4 दिवसात अनेक राज्यांमध्ये मान्सून सक्रिय राहील.

कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. IMD ने पूर्व मध्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 28 जुलैपासून बिहारमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. 28 जुलैपर्यंत ओडिशा आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये 27 आणि 28 जुलैपर्यंत पाऊस पडेल असे सांगण्यात आले आहे.

29 जुलैपर्यंत अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्येही अशीच परिस्थिती असल्याची चर्चा आहे. 27 आणि 28 जुलै रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रात, भारतीय हवामान खात्याने रायगड, पुणे, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून ‘रेड’ अलर्ट जारी केला आहे. मुंबई, पालघर आणि ठाण्यात ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -