लाखांदूर या ठिकाणी एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत जंगल परीसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. ही घटना 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील चिचोली(chicholi) जंगल परीसरात घडली आहे. पिडीत अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन आरोपी युवकांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आरोपींची नावे समीर आबाजी शहारे व सुरज प्रभाकर मेश्राम अशी आहेत. घटनेच्या दिवशी दोन्ही आरोपी बिना नंबरप्लेटच्या दुचाकीने लाखांदूरात आले होते.
या दोघांनी अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत दुचाकीवरुन जंगल परीसरात नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर या पीडितेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली.
यानंतर या मुलीच्या माहितीवरुन तब्बल दोन दिवसानंतर पिडीत अल्पवयीन मुलीसह कुटुंबियांनी 21 ऑगस्ट रोजी लाखांदूर पोलीसांत तक्रार दाखल केली. पीडितेने केलेल्या तक्रारीवरून लाखांदूर पोलीसांनी आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रीना जनबंधु व लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे करीत आहेत.