कोल्हापूर जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्र परिसरात पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने पंचगंगा, कृष्णा वारणा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे तसेच अलमट्टी धरणातून मोठ्या | प्रमाणात विसर्ग सुरू आहे त्यामुळे पंचगंगा नदीवर असणाऱ्या शिरढोण कुरुंदवाड पुलावरील पुराचे पाणी ओसरल्याने हा पूल आज वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तसेच शिरढोण नांदणी रस्त्यावरील पुराचे पाणी गेल्याने हा देखील मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसापासून पावसाची संततधार चालू असल्याने तसेच धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने पंचगंगा, कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली होती त्यामुळे शिरढोण कुरुंदवाड हा पूल पाण्याखाली गेला होता.
गेल्या तीन ते चार दिवसा पासून धरण पाणलोट क्षेत्रात तसेच शिरोळ तालुक्यामध्ये पावसाने थोडी विश्रांती घेतली असल्याने व राधानगरी धरण, चांदोली धरण, व कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे शिरढोण कुरुंदवाड पुलावरील पाणी ओसरल्याने हा पूल आज वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तसेच शिरढोण नांदणी या मार्गावरील ओढ्यात आलेले पाणी ओसरल्याने हा मार्ग देखील सुरू झाला आहे.