केद्रातील विविध तपास यंत्रणा महाराष्ट्रात विविध प्रकरणांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जोरदार कारवाया करत असताना, आता ठाकरे कुटुंबातील व्यक्तीच तुरुंगात जाणार असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.कोरोना घोटाळ्यातील संशयित आरोपी सुजीत पाटकर यांनी ईडीकडे साक्ष दिली आहे.
‘ईडीने जबरदस्तीने, धाक दाखवून माझा जबाब नोंदवून घेतल्याचे सुजीत पाटकर यांनी जबाबात म्हटले आहे. त्याबाबत संजय शिरसाट यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, ‘यांना उगाच चौकशीसाठी बोलावले का? मारून मुटकून आरोप सिद्ध करता येत नाहीत. गुन्ह्यात अडकल्याचे पुरावे असतील तरच शिक्षा होते.”तुम्ही खून जरी केला असेल पण पुरावे नसतील तर न्यायालय सोडते ना? पुरावा असेल तर तुम्हाला कुठेही माफी मिळत नाही. त्यामुळे याचिका दाखल करून काहीच होत नाही. त्यामुळे त्यांना मदत करणारे जे कोणी असेल तर त्यांना सांगतो की आता वेळ तुमची येणार आहे. तुम्हाला तुरुंगात जावेच लागणार आहे,’ असा इशारा शिरसाट यांनी दिला आहे.
दरम्यान, कोण तुरुंगात जाणार असे शिरसाट यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी थेट नावेच घेतली. ते म्हणाले की, ‘यात सर्वच आहेत. संजय राऊत असेल, अनिल परब असेल.’ ठाकरे कुटुंबातील कोणीही असेल तरी ते आत जाणारच असा दावा त्यांनी यावेळी संजय शिरसाट बोलताना केला आहे.
ठाकरे कुटुंबातील व्यक्तीच तुरुंगात जाणार’; शिंदे गटातील आमदाराच्या दाव्याने खळबळ
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -