ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या,मंगळवारी सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुख्य शासकिय ध्वजारोहण सोहळा होणार आहे.
या ध्वजारोहण सोहळ्याला जिह्यातील खासदार, आमदार यांच्यासह लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शासकिय ध्वजारोहणाच्या वेळेत कोणीही ध्वजारोहण कऊ नये.
तसेच मुख्य शासकिय ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर सर्वांनी उपस्थित रहावे, सुरक्षिततेच्या कारणास्तव कोणतीही बॅग सोबत आणू नये, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
कोल्हापूर ; स्वातंत्र्यदिनी उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकिय ध्वजारोहण
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -