ताजी बातमी/ऑनलाइन टीम
इचलकरंजी व परिसरात अल्पावधीतच नावा रूपास आलेल्या सेवासदन हेल्थ प्लस या रुग्णालयाचे योगदान फार मोठे ठरू लागले आहे. रुग्णांना कमीत कमी खर्चात अधिकाधिक चांगली सेवा देण्याचे कार्य येथे केले जाते.
नुकताच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सेवासदन हेल्थ प्लस हॉस्पिटलमध्ये नेत्ररोग विभाग सुरु करण्यात आला आहे. सदर हॉस्पिटल मध्ये नव्याने रुजू झालेल्या डॉक्टर पूजा कुलकर्णी ( MD. DNB opthalmologist ) गोल्ड मेडलिस्ट आहेत.
तसेच त्यांना अरविंद आय हॉस्पिटल, मदुराई येथे आठ हजार पेक्षा जास्त शस्त्रक्रियांचा अनुभव आहे.
पापण्यांचा आजार पापण्याच्या कॅन्सर निदान व उपचार, डोळ्याच्या मागच्या गाठी डोळ्यांचे कॅन्सर, लहान मुलांचे डोळ्याचे कॅन्सर ,झुकलेल्या पापण्यांसाठीची सर्जरी, डोळ्यांची कॉस्मेटिक सर्जरी यामध्ये त्या निष्णात आहेत.
या सर्व शस्त्रक्रिया करणाऱ्या सांगली ,कोल्हापूर ,रत्नागिरी सिंधुदुर्ग ,सातारा या जिल्ह्यामधील त्या एकमेव आहेत.आता या सेवांसाठी मुंबई व पुण्याला जाण्याची गरज नाही. या सर्व सेवा आपल्याला इचलकंरजी येथे उपलब्ध झाल्या आहेत.
या सेवांचा लाभ इचलकरंजी व आसपासच्या नागरिकांनी घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी मनोज बावणे यांनी केले.
इचलकरंजीत सेवासदन हेल्थ प्लस हॉस्पिटलमध्ये नेत्ररोग विभाग सुरू:
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -