पुणे शहर अनियंत्रितपणे वाढत आहे. कोणाला याची काळजी नाही. मतदार वाढवा, मतदान पदरात पाडून घ्या आणि बाकी गेलं तेल लावत, अशी सरकारची मानसिकता असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी हडपसरमध्ये त्यांनी पत्रकारांची संवाद साधला.राज्यात खड्डे पहिल्यांदा पडलेले नाहीत. याआधीही खड्डे होते. मला आश्चर्य जनतेचे वाटतं. प्रत्येकवेळी प्रतिनिधी तु्मच्यासमोर खड्डे आणि इतर मुद्दे उपस्थित करत असतात. काम मात्र करत नाहीत.
पण पुन्हा पुन्हा तुम्ही त्याच नेत्यांना जातीच्या, धर्माच्या मुद्द्यावरुन निवडून देतात. हे प्रश्न तसेच राहतील. जोपर्यंत लोकांचा राग मतपेटीमध्ये उतरत नाही तोपर्यंत हे खड्डे बुजणार नाहीत, असं ते म्हणाले.कायदा नावाची गोष्ट राहिलेली नाही. निवडणुका कधी होतील तर आम्हाला वाटतील तेव्हा होणार अशी यांची भूमिका आहे. तुम्ही कोणीही सरकारला प्रश्न विचारत नाही. प्रतिनिधींचं शहराकडे लक्ष नाही. टाऊन प्लॅनिंग नाही, आज पाच-पाच पुणे झाले आहेत. आपण आज जेथे आहोत त्याला तुम्ही हडपसर म्हणता. पण हडपर मागे गेलं, असं ते म्हणाले.
मतदार वाढवा, मतदान पदरात पाडून घ्या आणि बाकी गेलं तेल लावत अशी यांची मानसिकता आहे. तुम्ही त्यांना काही विचारत नाही, त्यामुळे सरकारचं लक्ष नाही. काही नियम असतात, लोकसंख्येनुसार किती हॉस्पिटल असावे, किती घरं असावी याची प्लॅनिंग असते. मुंबईतील ब्रिटिश काळातील प्लॅनिंग चांगलं होतं. असल्या गोष्टी आपल्याकडे होत नाहीत. जन्म झालाय म्हणून जहताहेत,अशी उदिग्न प्रतिक्रिया राज यांनी दिली.मनसेने यापूर्वी अनेक आंदोलनं केली, पण पदरी काय पडलं.
महाराष्ट्राचे नुकसान करतात त्याला निवडून देतात. असो पुण्यात सोळा ठिकाणी आंदोलनं झाली. सरकारचे डोळे उघडतील अशी आशा आहे. सगळ्या ठिकाणी तोडफोड करायची गरज नसते. लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, असं मी कार्यकर्त्यांना सांगितलं . आंदोलन ज्यांच्यासाठी आहे त्यांनाच त्रास होऊ देऊ नका, असं ते म्हणाले.