Tuesday, July 29, 2025
HomeइचलकरंजीIchalkaranji : मांजर गायब झाल्याच्या कारणावरून कोयता, लोखंडी सळीनं तुंबळ हाणामारी; हल्ल्यात...

Ichalkaranji : मांजर गायब झाल्याच्या कारणावरून कोयता, लोखंडी सळीनं तुंबळ हाणामारी; हल्ल्यात बापासह दोन मुलं जखमी

इचलकरंजी : कबनूर ता. हातकणंगले येथे मांजर गायब झाल्याच्या कारणावरून कोयता, लोखंडी सळीने तुंबळ हाणामारी झाली. या हल्ल्यात बापासह दोन मुले जखमी झाली आहेत.इस्माईल रेहमान मकानदार (वय ४२), तौफिक इस्माईल मकानदार (वय १९), आसिफ इस्माईल मकानदार (वय २१) अशी त्यांची नावे आहेत. या हल्ल्यानंतर जखमींच्या समर्थकांनी हल्लेखोरांच्या घरावरच हल्ला करत नुकसान केले.याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कबनूर येथील दावतनगर परिसरात इस्माईल मकानदार हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्याच परिसरातील बबलू खान यांनी घरी मांजर पाळले आहे. ते मांजर घरात न आढळल्याने खान यांचा मकानदार यांच्याशी वाद झाला होता.हा वाद काल सकाळी पुन्हा उफाळून येत वादावादी झाली. यातून बबलू खान यांच्यासह सहा ते सात जणांनी इस्माईल मकानदार यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच लोखंडी सळीनेही मारहाण केली. तौफिक आणि आसिफ या मुलांनाही मारहाण करुन जखमी केले. जखमींवर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर जखमींच्या समर्थकांनी हल्लेखोरांच्या घरावर हल्ला करत प्रापंचिक साहित्याचे नुकसान केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -